मनपा तरफे स्वराज महोत्सव अंतर्गत देशभक्ति गीतांचा कार्यक्रम

बातमी शेअर करा...

 

 

*नागरिकांना संत एकनाथ रंगमंदिर येथे कार्यक्रम बघायला संधी*

 

औरंगाबाद.

दि.16ऑगस्ट

 

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. या अनुषंगाने दि 17 ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभासाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

मा.प्रशासक तथा आयुक्त मा. डॉ .अभिजीत चौधरी ह्यांचा मार्गदर्शनाखाली प्रा.राजेश सरकटे निर्मित व स्वरविहार प्रस्तुत वंदे मातरम देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राजेश सरकटे , सरला शिंदे, शितल रुद्रवार, सतीश मातोळे हे कलावंत गीत सादर करणार आहेत. सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार यांचे राहणार आहे.

 

या कार्यक्रमास मा.प्रशासक तथा आयुक्त मा. डॉ .अभिजीत चौधरी, मा.अतिरिक्त आयुक्त ब भि नेमाने, रविंद्र निकम , विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सायं 7.30 वाजता संत एकनाथ रंग मंदिर ,उस्मानपुरा येथे आयोजीत या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनपाच्या वतीने सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम