
मन की बात” मध्ये व्होकल फॉर लोकल चा पंतप्रधान यांनी दिला मंत्र
मन की बात” मध्ये व्होकल फॉर लोकल चा पंतप्रधान यांनी दिला मंत्र
सावदा येथे केतकीताई पाटील यांचे सह पदाधिकारी उपस्थित
सावदा (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 126 वा मन की बात मध्ये नागरिकांशी संवाद साधला यात त्यांनी प्रथम शहिद भगतसिग व गान कोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. या नंतर कार्यक्रमात त्यांनी जी एस टी महोत्सवाचा उल्लेख करीत कमी झालेल्या जी एस टी मुळे नागरिकांना फायदा होईल असे वक्तव्य केले. तर आपण सर्वांनी व्होकल फॉर लोकल चा मंत्र अमलात आणून स्वदेशी वस्तू वापराव्या व स्वदेशी वस्तुंना आपल्या जीवनात प्राधान्य द्यावे असे सांगताना येत्या 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त किमान एक तरी खादी चे वस्त्र खरेदी करून ते वापरावे असे आवाहन देखील यावेळी केले. छट पूजा व दुर्गा पूजा आता आंतरराष्ट्रीय महोत्सव बनले आहेत. सर्व जगात हे साजरे केले जात आहे असे सांगितले. सर्वात शेवटी त्यांनी येणाऱ्या सर्व सण व महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा देखील दिल्या
हा मन की बात कार्यक्रम सावदा येथे संतोष परदेशी यांचे दुर्गा केबल चे कार्यालयात सावदा भाजपा मंडळा तर्फे आयोजित करण्यात आला. यावेळी भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा डॉ सौ केतकीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, बेटी बचावच्या जिल्हासंयोजिका सारिका चव्हाण, सावदा मंडळ सरचिटणीस महेश अकोले, सावदा मंडळ उपाध्यक्ष संतोष परदेशी, माजी उपनगराध्यक्षा सौ नंदाबाई लोखंडे, सावदा मंडळ ओ.बी.सी, मोर्चा अध्यक्ष सचिन ब-हाटे, कोषाध्यक्ष जितेंद्र पाटील सर, सावदा मंडळ प्रसिद्ध प्रमुख दिपक श्रावगे, प्रतीक भारंबे, राकेश पाटील, महंत निलगिरी कॉम्प्युटर च्या संचालिका वर्षा परदेशी, दुर्गा केबल चे संचालक किशोर परदेशी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
तर या नंतर भाजपा तर्फे नागरिका मधून स्वदेशी संकल्प पत्र भरण्याची मोहीम सुरू करण्यात येत असून यात आपण स्वदेशी चा वापर करू असे नमूद असून हे स्वदेशी संकल्प पत्र देखील उपस्थितानी भरून दिले. या संकल्प पत्राद्वारे स्वदेशी वस्तूंचा दैनंदिन जीवनात वापर करण्याची प्रतिज्ञा घेत असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम