मयताच्या नातेवाईकांना दोन लाखाचा धनादेश

मयताच्या नातेवाईकांना दोन लाखाचा धनादेश कजगाव ता भडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेच्या वतीने मयत खातेदारांच्या नातेवाईकांना दोन लाखाचा धनादेश देण्यात आला घुसर्डी ता भडगाव येथील रहिवासी सुनंदा अंबादास शिंदे यांचा २६ डिसेंबर-२०२१ रोजी रस्ते अपघात दुर्दैवी मृत्यू झाला होता तसेच त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत बारा रुपयेचा वार्षिक विमा काढला होता मयत सुनंदा शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना बँकेच्या वतीने दोन लाखाचा धनादेश देण्यात आला मयताचा मुलगा योगेश शिंदे यांनी धनादेश स्वीकारला यावेळी शाखा व्यवस्थापक दिपक पाटील कमलशांती पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद ललवाणी कमलशांती पतसंस्थचे मॅनेजर कैलास महाजन युवराज पाटील अंबादास शिंदे महेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आला विमा रक्कम मंजूर करण्यासाठी क्षेत्रीय व्यस्थापक(नाशिक विभाग) एस.जे.पाटील शाखा व्यवस्थापक दिपक पाटील उपशाखा व्यवस्थापक स्वप्नील मोंन्देकर कॅशियर सुकन्या कदम संदेशवाहक राहुल पाटील ह्यांचे वारसदार व नातेवाईकानीं आभार मानले

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम