मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याअंतर्गत कथाकथनकार सचिन देवरे यांचे कथाकथन

शिवकालीन कवी-भूषण यांच्या जीवनावर कथा सादर

बातमी शेअर करा...

मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याअंतर्गत कथाकथनकार सचिन देवरे यांचे कथाकथन

शिवकालीन कवी-भूषण यांच्या जीवनावर कथा सादर

जळगाव I प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातर्फे सुरू असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याअंतर्गत कथाकथनकार सचिन देवरे यांचे कथाकथन झाले.

अध्यक्षस्थानी प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे होते. श्री.देवरे यांनी शिवकालीन कवी-भूषण यांच्या जीवनावर कथा सादर केली. शिवराय डोक्यावर नव्हे डोक्यात घ्या.

त्यांच्या कथा कायम प्रेरणादायी असतात असे श्री देवरे म्हणाले. प्रा.पगारे यांनी कथा सादर करतांना आरोह, अवरोह, आणि प्रसंगावधान लक्षात घेणे गरजेचे असते असे मत व्यक्त करीत दोन कथा सादर केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारती सोनवणे यांनी केले. कृष्णा संदानशिव यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम