महाआंदोलन – शासन प्रशासनाचा तीव्र निषेध करून कोळी जमातीचे महाआंदोलन तुर्त स्थगित

१५ फेब्रुवारीला मिशन आझाद मैदान - अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचा सुचक इशारा

बातमी शेअर करा...

बातमीदार | रविवार दि 11 फेब्रुवारी 2024

महाआंदोलन – शासन प्रशासनाचा तीव्र निषेध करून कोळी जमातीचे महाआंदोलन तुर्त स्थगित

१५ फेब्रुवारीला मिशन आझाद मैदान – अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचा सुचक इशारा

चोपडा – 
आदिवासी कोळी जमातीच्या संविधानिक न्याय, हक्क व अधिकारांसाठी २३ जानेवारी पासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक व

महाआंदोलन

राज्यव्यापी महाआंदोलनाचे निमंत्रक अॕड शरदचंद्र जाधव पुणे, व प्रभारी अध्यक्ष आयोजक सखाराम बिऱ्हाडे छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाने अन्नदान सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर जळगांव

यांच्या अध्यक्षतेखाली शांतता, कायदा व सुव्यवस्था राखून राज्यभर अन्नत्याग सत्याग्रह, ठिय्या आंदोलन, साखळी उपोषण सुरू होते. याबाबत प्रत्येक जिल्हाधिकारी यांना अतिसंवेदनशील निवेदन देण्यात आलेले होते.

https://www.facebook.com/share/p/YkmzKEvmb1JQYHFm/?mibextid=2JQ9oc

आंदोलनकर्त्यांच्या कायदेशीर मागण्यांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविलेल्या अहवालानुसार संबंधीत आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांशी मंत्रालयात सविस्तर मुद्देसूद चर्चा करण्यात आली.

लवकरच मुख्यमंत्री यांचेशी याविषयी शासकीय बैठक घेण्यात येणार असून या महाआंदोलनामुळे आदिवासी कोळी जमातीच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात १९८६ पासून धुळ खात पडलेल्या कै. दाजिबा पाटील समितीच्या अहवालावर विधीमंडळात विस्तृत चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तरीसुद्धा १९ दिवस चाललेल्या ह्या राज्यव्यापी महाआंदोलनाकडे शासन प्रशासनासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व आदिवासी विकास विभागाने हेतुपुरस्कर दुर्लक्ष करून वेळकाढूपणा केल्याबद्दल सर्व जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

लवकरच सर्व प्रमुख पदाधिकारी, उपोषणकर्ते व आंदोलनकर्त्यांची मुंबई येथे बैठक घेण्यात घेऊन तातडीने मिशन आझाद मैदान राबविण्यात येईल.

आदिवासी कोळी जमातीबाबत राजकारणातील शत्रू व मित्रांनी सारखीच भुमिका निभावल्याने त्या सर्वांचा तीव्र धिक्कार व जाहीर निषेध करून या राज्यव्यापी महाआंदोलनास तुर्तास स्थगिती देण्याबाबत निर्णय घेऊन

पुढील समाजहिताची रणनीती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकांन्वये दिलेली आहे.

याप्रसंगी जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी उपोषणकर्ते पद्माकर कोळी यावल यांना जळगांवचे माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे यांचे शुभहस्ते लिंबुपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी रणरागिणी ग्रुपच्या अध्यक्षा मंगलाताई सोनवणे, नगरसेवक भरत सपकाळे, समाजसेवक प्रा. भाऊसाहेब सोनवणे, पुंडलिक सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, अनिल सोनवणे, बबलु सपकाळे, डॉ. गोकुळ बिऱ्हाडे, निंबामामा सोनवणे, पांडुरंग सोनवणे, जगदीश सोनवणे,

सचिन सपकाळे, किशोर सोनवणे, सुरेश कोहली, सचिन सपकाळे, युवराज ठाकरे, प्रल्हाद सोनवणे, संजय बाविस्कर, कल्पेश कोळी, शिवाजी सूर्यवंशी, जितेंद्र सोनवणे,

रवींद्र पाटील, पी.एल.सपकाळे, नारायण सपकाळे, रवींद्र कोळी, आनंद सपकाळे, अक्षय सोनवणे, गणेश बाविस्कर, संजय बाविस्कर, भिकन नन्नवरे, समाधान नन्नवरे, संजय सूर्यवंशी, सागर सोनवणे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा👇

आदिवासी कोळी जमातीच्या महाआंदोलनास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम