
महाराष्ट्र एक्सप्रेस अत्याधुनिक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत दाखल
महाराष्ट्र एक्सप्रेस अत्याधुनिक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत दाखल
जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी! गेल्या ५३ वर्षांपासून गोंदिया-कोल्हापूर मार्गावर धावणारी लोकप्रिय महाराष्ट्र एक्सप्रेस (गाडी क्र. ११०४०) आता अत्याधुनिक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. या बदलामुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायक आणि वेगवान होणार आहे.या महत्त्वपूर्ण बदलासाठी जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन एलएचबी कोचेस उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आणि १ जून २०२५ पासून ही गाडी नव्या कोचेससह धावू लागली.या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून ३ जून २०२५ रोजी जळगाव रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या लोको पायलटचे फुलांनी स्वागत करण्यात आले. पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या स्वागत सोहळ्याचे आयोजन भाजप रेल्वे प्रकोष्ठ, भारतीय जनता पक्ष जळगाव आणि धरणगाव तालुका प्रवासी मंडळ यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. राधेश्याम चौधरी, भैरवी वाघ पलांडे, सीमाताई भोळे, प्रतीक शेठ गुजराथी, महेंद्र कोठारी, अरुण नाफडे यांचा समावेश होता.
या सर्व मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून नव्या स्वरूपातील महाराष्ट्र एक्सप्रेसला पुढील प्रवासासाठी रवाना केले.
याप्रसंगी गोपाळ भंगाळे, रोहित वाघ, रेखाताई कुलकर्णी, गोविंद लाठी, अशोक गाडगे, शरद मोरे, स्वप्नील सकलिकर, प्रकाश पंडित, आनंद जैन, भूषण भोळे, अल्पेश कोठारी, मुविकोराज कोल्हे, योगेश पाटील, निलेश तायडे, महेंद्र कोठारी, रविंद्र भागवत, एस. डब्ल्यू. पाटील, किरण वाणी, डॉ. मिलिंद डहाळे, आनंद बाचपाई, ललित येवले, हितेश पटेल, सुनील चौधरी, किरणसिंह परिहार, दिनकर पाटील, संतोष सोनवणे, सुशिल कोठारी, सुदाम चौधरी, बाबा कासार. आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम