
महावितरणच्या सहाय्य्क अभियंता लाच घेतांना जाळ्यात
महावितरणच्या सहाय्य्क अभियंता लाच घेतांना जाळ्यात
चोपड्यात एसीबीची कारवाई:
चोपडा प्रतिनिधी
चोपड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाने मोठ्या सापळा कारवाईत सहायक अभियंता अमित दिलीप सुलक्षणे याला रंगेहात पकडले. सुलक्षणे हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, चोपडा शहर कक्षा 2 मध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत होते. त्याने एका तक्रारदाराकडून नवीन वीज मीटर बसवण्यासाठी ५,५०० रुपये लाच मागितले होते. नंतर तडजोडीअंती लाच रक्कम ४,५०० रुपये ठरवली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाने तक्रारीची पडताळणी केली आणि १२ मार्च रोजी सापळा रचून सुलक्षणे याला लाच स्वीकारताना अटक केली. यावर चोपडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, पो. ना. मराठे आणि पो. ना. राकेश दुसाने यांचा समावेश होता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम