
महिला मंडळ शाळेत जागतिक वन दिन साजरा
चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र
महिला मंडळ शाळेत जागतिक वन दिन साजरा
चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र
चोपडा – येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जागतिक वन दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत चौधरी, संजय बारी यांच्यासह चोपडा वनक्षेत्रपाल तुषार देवरे, वनपाल अस्मिता पगार, वनरक्षक श्रीमती धनगर, श्रीमती अंबुरे, लिपिक गुणवंत देसले, वनसेवक अंकुश भिल हे उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षक संजय बारी यांनी जागतिक चिमणी दिनाविषयी तर वनक्षेत्रपाल तुषार देवरे यांनी जागतिक वन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती दिली. मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांचे कौतुक केले. यावेळी विद्यालयाच्यावतीने रोपटे देऊन उपस्थित सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. तर वनीकरण विभागातर्फे उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मातीची भांडी विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली.
चित्रकला स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे: प्रथम – पियुष सचिन बारी (९अ), द्वितीय – आदित्य कैलास माळी (८अ), तृतीय – चैताली दीपक माळी (७अ), उत्तेजनार्थ – मानसी अरुण महाजन (८अ), निधी प्रमोद पाटील (६अ), सान्वी सचिन बारी (५अ). या स्पर्धेत विद्यालयातील ५१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक विजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय सोनवणे यांनी तर आयोजनासाठी प्रशांत चव्हाण यांनी सहकार्य केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम