महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित जळगाव येथील मेळावा

शासनाकडून महिलांच्या सबलीकरण कार्य हा परमार्थ ; अधिकाधिक बहिणींनी कार्यक्रमाला यावे - पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा...

महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित जळगाव येथील मेळावा

शासनाकडून महिलांच्या सबलीकरण कार्य हा परमार्थ ; अधिकाधिक बहिणींनी कार्यक्रमाला यावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव l जिमाका

शासनाकडून महिलांच्या सबलीकरणासाठी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ असून बहिणींच्या हातात चार पैसे येतील त्या सक्षम होण्याचं हे पहिलं पाऊल असेल.

महाराष्ट्र शासनाकडून हे मोठे कार्य होत आहे, हा एका अर्थानी परमार्थ आहे. अशा कार्याची सुरुवात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जळगाव मध्ये होत आहे. 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकाधिक बहिणींनी यावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

महिला

राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत’ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्क जळगाव येथे 13 ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे.

त्याअनुषंगाने जिल्ह्यातील आमदार, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, ‘ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे तालुकानिहाय अध्यक्ष, सचिव यांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते.

या बैठकीला आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी, यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक तालुक्यातून या कार्यक्रमासाठी भगिनी येणार आहेत. त्यांची जबाबदारी त्या त्या तालुका समितीचे पदाधिकारी, अधिकारी यांची राहणार आहे.

ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या पदाधिकारी यांना सन्मानाने सहभागी करून घेवून या कार्यक्रमाला अधिकाधिक, भगिनी यांच्यासह इतर नागरिक उपस्थित राहतील.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बहिणीला येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ‘लाडक्या बहिणीला’ ही ओवाळणी आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला हा भावनिक पदर आहे. अशा कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत पाटील, आ.लताताई सोनवणे यांनीही काही महत्वाच्या सूचना यावेळी केल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम