महेश पाटील यांच्या तब्येतीची नवलसिंग राजे पाटील यांनी केली  विचारपूस 

बातमी शेअर करा...

महेश पाटील यांच्या तब्येतीची नवलसिंग राजे पाटील यांनी केली  विचारपूस 

भुसावळ : शहरातील श्रद्धानगर येथील रहिवासी महेश जगन्नाथ पाटील यांची तब्येत मागील दीड महिन्यापासून बिघडली होती. मुंबई येथील के-ईएम रुग्णालयात त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. सध्या ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे खाजगी सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांनी महेश पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृत्तीची विचारपूस केली. यावेळी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करून त्यांना सुखी, समृद्ध आणि निरोगी आयुष्य लाभावे अशा शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी महेश पाटील यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी युवा शिवसेना धरणगाव तालुका उपाध्यक्ष महेश पाटील, प्रमोद पाटील व जितेंद्र चौधरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम