मारहाण – चिंचखेडे येथे खड्डे खोदण्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण
भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी व मुलाला देखील मारहाण
बातमीदार l शुक्रवार दि. १ मार्च २०२४
चाळीसगाव ;- ग्रामपंचायत गावठाणच्या जागेत कम्पाऊंडसाठी खड्डे खोदण्याच्या कारणावरून एकाला लोखंडी वस्तूने आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. शिवाय भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी व मुलाला देखील मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चिंचखेडे येथे घडली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील चिंचखेडे येथे निंबा मुरलीधर पाटील वय ५४ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेत कंम्पाऊडसाठी खड्डे करण्याचे काम सुरू होते. निंबा पाटील यांनी खड्डे खोदण्याचे काम सुरू असतांना गावातील रविंद्र मुरलीधर पाटील, निखील रविंद्र पाटील, स्वप्निल रविंद्र पाटील, सुनंदा रविंद्र पाटील रा. चिंचखेडे ता. चाळीसगाव यांनी शिवीगाळ करत लोखंडी वस्तू आणि दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हे भांडण सुरू असतांना भांडण सोडविण्यासाठी आलेल्या निंबा पाटील यांची पत्नी आणि मुलगा यांना देखील शिवीगाळ व मारहाण केली. या घटनेनंतर गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश मांडोळे हे करीत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम