मिशन ग्रीनर जळगावतर्फे वृक्षारोपण

बातमी शेअर करा...
मिशन ग्रीनर जळगावतर्फे वृक्षारोपण
जळगांव (प्रतिनिधी) जळगाव शहरात पर्यावरणासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि विविध सेवाभावी संस्था सर्व प्रयत्न करीत आहेत.तसाच उपक्रम शहरातील मिशन ग्रीनर तर्फे या वर्षी जुन २०२५ पासुन  शहरातील विविध परिसरात व़ुक्षारोपण केले जात आहे. आज असाच उपक्रम गुजराल पेट्रोल पंपासमोरील आदित्य हाॉस्पिटल च्या बाजूला चिंचेचे चार झाडांची रोपे लावण्यात आली. या प्रसंगी अजिंक्य तोतला, अक्षय पाठक, आशुतोष रंगा, खुशाल बापेचा, विशाल पाटील, रवि नेटके, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी मदन लाठी, विक़म अस्वार, जैन इरिगेशन सिस्टीम लि चे राजेंद्र राणे आणि विविध सदस्य उपस्थित होते.
यापुर्वी २१ जुन २०२५ रोजी आय एम आर काॅलेज जवळ, २८ जुन २०२५ रोजी अंबरनील ग़ाउडवर,
५ जुलै २०२५ रोजी शंकर अप्पा नगर, १२ जुलै २०२५ पांडे चौक, १९ जुलै २०२५ रोजी हाउसिंग सोसायटी परिसर, २६ जुलै २०२५ गणेश कॉलनी, ३ ऑगस्ट रोजी आदित्य हाॉस्पिटल च्या समोर, ७ ऑगस्ट २०२५ रोजी राजमुद्रा गार्डन हायवेवर, परत ३० ऑगस्ट २०२५ रोजी त्याच ठिकाणी बाजूला आणि आज म्हणजे ३ सप्टेंबर रोजी सकाळी परत आदित्य हाॉस्पिटल च्या बाजूला
झाडांची रोपे लावण्यात आली.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम