मुक्ताईनगरात कॅरीबॅगमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार २९ ऑगस्ट २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेसाची अतिशय क्रूर हत्या झाल्याने बातमी उघडकीस आल्याने परिसर हादरला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर ते बर्‍हाणपूर महामाार्गवर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणार्‍या पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी एका महिलाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. विशेष बाब म्हणजे तिची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग्जमध्ये भरून तिथे टाकल्याचे आढळून आले. संबंधीत महिलेची ओळख पटली नसून तिचे वय साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह हा वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरात हे वृत्त वार्‍यासारखे पसरताच एकच खळबळ उडाली. अनेक ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली आहे. तर मृतदेह काढण्याचे काम शेवटचे वृत्त हाती आले तोवर सुरूच होते.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात खूनाच्या सातत्याने घटना घडत आहेत. यात जळगाव शहरात दोन हत्या झाल्या असून यावल तालुक्यात दोन, चाळीसगाव एक खून झाले आहेत. या पाठोपाठ आता मुक्ताईनगर तालुक्यात हत्या झाल्याने परिसरखळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम