मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव भाजपचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ रक्तदानाचा संकल्प

बातमी शेअर करा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव भाजपचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ रक्तदानाचा संकल्प

जळगाव – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण राज्यभरात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा महानगर भाजपच्या वतीने प्रत्येक मंडळात दोन ठिकाणी किमान शंभर बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जी.एम. फाउंडेशन येथील भाजप कार्यालयात यासंदर्भातील नियोजन बैठक पार पडली.

बैठकीत शहरातील पाच प्रमुख मडलांमधून प्रत्येकी दोन ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येकी शिबिरातून शंभर युनिट्स म्हणजेच किमान पाचशे युनिट रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बैठकीदरम्यान बोलताना दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक कार्याची जाण असलेले नेते आहेत. त्यांच्या प्रेरणेनेच राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांनी रक्तदानासारखा विधायक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे.

या बैठकीस विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, दीपमाला ताई काळे, अक्षय चौधरी, विनोद मराठे, अतुल बारी, महेश पाटील, मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, डॉ. मनोज टोके, पितांबर भावसार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या महा रक्तदान उपक्रमामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपयुक्ततेने साजरा होणार असून, जळगाव महानगरातही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम