
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शुभारंभ कार्यक्रम उत्साहात
लाडक्या बहिणींनी समिती सदस्यांना बांधल्या राख्या
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शुभारंभ कार्यक्रम उत्साहात
लाडक्या बहिणींनी समिती सदस्यांना बांधल्या राख्या
चोपडा l प्रतिनिधी
चोपडा नगर परिषद येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शुभारंभ कार्यक्रम अंतर्गत चोपडा तालुक्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना समितीचे अध्यक्ष नामदेव बाबुराव पाटील, सदस्य विकास काशीनाथ पाटील, अशासकिय सदस्य गोरखभाऊ कोळी
यांच्या प्रमुख उपस्थीतीत चोपडा तालुक्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शुभारंभ कार्यक्रम दाखविण्यात आला.
शनिवार दि. 17 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींनी समितीचे अध्यक्ष व सदस्यांना राख्या बांधल्या. तसेच उपस्थीत लाडक्या बहिणींनी योजनेचे रू. ३०००/- मिळाले बाबत चे मॅसेज समितीचे अध्यक्ष व सदस्यांना दाखविले.
सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी भाऊसाहेब थोरात तहसीलदार, संजय धनगर, बाल विकास प्रकल्प अधिकारी, राहुल पाटील, मुख्याधिकारी नगर परिषद चोपडा, आशिष पवार, संरक्षण अधिकारी व सर्व पर्यवेक्षिका एकात्मिक बाल विकास सेवा योजना चोपडा यांनी परीश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम