मुल्याधिष्ठीत जिवनासाठी बुध्द चरित्राची आवश्यकता – राधेशाम चांडक

बुलढाणा येथे महापंडीत पु. सध्दर्माचार्य भिक्षु प्रियदर्शी थेरोजी येणार

बातमी शेअर करा...

मुल्याधिष्ठीत जिवनासाठी बुध्द चरित्राची आवश्यकता – राधेशाम चांडक

बुलढाणा येथे महापंडीत पु. सध्दर्माचार्य भिक्षु प्रियदर्शी थेरोजी येणार

बुलढाणा प्रतिनिधी

दिवसेंदिवस मानवी जीवनातील मुल्यांची घसरण होत आहे. माणसाला माणसाकडून माणुसकीची वागणुक मिळत नाही हिंसा, कुरता, व्यभिचार, असत्य समाजात दिसत आहे. अशा परिस्थितीत युवक व विद्यार्थ्यांमध्ये मुल्य शिक्षणाचे धडे आवश्यक झाले आहे. मुल्याधिष्ठीत जीवनासाठी बुध्द चरित्र कथेची आवश्यकता आहे, आणि ही संधी स‌द्भावना सेवा समीती व सिंहनाद सेवा संघ यांनी दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सहकार विद्यामंदीर मध्ये सकाळी ११ ते ४ या वेळेत उपलबध्द करून दिली आहे असे प्रतिप्रादन स‌द्भावना सेवा समीतेचे अध्यक्ष राधेशाम चांडक आणि सिंहनाद सेवा संघाचे अध्यक्ष विजय वाकोडे यांनी केले आहे.

सहकार विद्यामंदीर समाभृहमध्ये भव्य स्टेज, एल.ई.डी. स्क्रीन, तीन हजार खुर्चा, बाहेर विशाल शामीयाना, पिण्याचे पाणी, बुक स्टॉल व फोटोची विक्री, इ. व्यवस्था आयोजकांनी केली आहे. श्रोत्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान करून यावे जेष्ठ नागरीकांसाठी खाजगी ऑटोची व्यवस्था केली.

बुध्द चरित्र भगवंत कथेची अमृतवर्षा करणारे महापंडीत पु. सध्दर्माचार्य भिक्षु प्रियदर्शी थेरोजी अनेक देशांचे भ्रमण करुन बुलडाण्याला येत आहेत. उच्च विद्याविभुषित, महाज्ञानी, प्रकांड पंडीत, अनेक सन्मान व अवार्डचे मानकरी थेरोजी संगीतमय बुध्द चरित्र कथा सादर करणार आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन राधेशाम चांडक उपाख्य भाईजी आणि विजय वाकोडे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिंहनाद सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम