मॉरीशस साहित्य सम्मेलनात अंबरनाथचे सुनील चौधरी अमेय रानडे यांचा सन्मान

मराठी भाषेला मोठ्या प्रमाणावर लागलेले अमराठी वळण थांबवण्याची गरज- विजय कुवळेकर, संमेलनाध्यक्ष आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन

बातमी शेअर करा...

शशिकांत कोठेकर l मॉरीशसहून

मराठी भाषा जतन करायची जबाबदारी केवळ सरकारची नसून ती आपल्या सगळ्यांची आहे. सध्या मराठी भाषेत बरेच अमराठी शब्द घुसले आहेत, मराठीला लागलेले हे अमराठी वळण थांबवण्याची गरज जेष्ठ पत्रकार, संपादक, लेखक विजय कुवळेकर यानी मॉरीशस येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.

कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठी स्पिकींग युनियन मॉरीशस अंतर्गत मॉरीशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरीशस मराठी कल्चर सेंट्रल ट्रस्ट यांच्या सहसंयोजनाने व महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित १७ वे आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन मॉरीशस येथे २ ते ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.

संमेलनाचे अध्यक्षपदी जेष्ट पत्रकार विजय कुवळेकर असून संमेलनाचे उदघाटन भारतीय कला व सांस्कृतिक संचलानलयाचे अध्यक्ष माजी खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मॉरीशसच्या भारतीय दुतावासाच्या हायकमिशनर नंदिनी सिंगला, मॉरीशस सरकारमधील हौसिंग तसेच लॅन्ड ट्रान्सपोर्ट व लाईट रेल्वे मंत्री ऑलन गानू, मॉरीशसचे मिनीस्टर ऑफ आर्ट एन्ड कल्चर मंत्री अविनाश तीलक, उपपंतप्रधान लीला देवी दुकून लाचूमान, कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्षा नमिता किर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, मॉरीशस मराठी स्पिकींग युनियन अध्यक्ष नितीन बाप्पू, स्वागताध्यक्ष मॉरीशसच्या निशा हिरू, आमदार संजय केळकर आदी उपस्थित होते.

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे परदेशात पहिल्यांदाच साहित्य संमेलन होत आहे. या साठी राज्यातून १०० साहित्यीक मॉरीशसला पोचले असून सकाळी पारंपारीक पध्दतीने भारतीय पेहराव नेसून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यानंतर पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

साधारणत १८८० च्या दशकात नोकरीच्या गरजेने महाराष्ट्रातील- कोकणातील अनेक लोक मॉरीशसला आले आणि त्यानंतर त्यांच्या पिढ्या येथेच स्थायिक झाल्या.

आत्ता त्यांची पाचवी पिढी मॉरीशसमध्ये राहत आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी ही पिढी कार्यरत असून आपले पूर्वज महाराष्ट्रातील असून त्यांचा शोध घेऊन मराठी संस्कृती व भाषा जतनासाठी ते कार्य करीत आहेत.

मराठी भाषेला मॉरीशसमधील अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळालेली असून भाषा जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मॉरीशस मराठी स्पिकींग युनियन अध्यक्ष नितीन बाप्पू यानी सांगितले.

१९९१ नंतर दुसरयांदा मॉरीशसमध्ये मराठी भाषिकांचे साहित्य संमेलन होत असून मॉरीशसचे कोकणाशी नाते पूर्वजांपासून जोडलेले आहे. आत्ताच्या काळात मराठी भाषेत कालानुरूप अनेक इंग्रजी व दुसरया भाषेतील शब्द घुसले आहेत.

हे बदल होत असताना मूळ भाषेचे स्वत्व तर गमावले जात नाही, कालानुरूप भाषेतील बदल करून ती भाषा जगाला लोकांसमोर दिली गेली पाहिजे असे मत स्वागाताध्यक्ष विजय कुवळेकर यानी व्यक्त केले. संमेलनाच्या उदघाटनासाठी सूत्रसंचालन अमेय रानडे यानी केले तर आभार राहुल निळे यानी मानले.

कोकण मराठी साहित्य परिषद व मॉरीशसमधील मराठी बंधू, भगिनीनी यावेळी महाराष्ट्राची परंपरा दाखवणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. दुपारच्या सत्रात मराठी भाषेचे जतन देशात व परदेशात यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

परिसंवादाला वक्ते म्हणून डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, व़ृषाली मगदूम, उषा परब, निशी हिरू, भालचंद्र गोविंद, किरून नाओजी मोईबीर आदीनी भाग घेतला. सूत्रसंचालन जयू भाटकर यानी केले. पहिल्या दिवशी शेवटचे सत्र कवी संमेलनाचे होते. त्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी अशोक नायगावकर तसेच अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, कोमसाप उपाध्यक्ष ठाणे जिल्हा यानी अंबरनाथ ला कै. बाळ कोल्हाटकर साहित्य कट्टा निर्मिति, पद्मश्री मधुमंगेश कर्णिक साहित्यपार्क निर्मिती तसेच बाबा साहेब पुरंदरे सभागृह, सर्व नगरपालिकेच्या माध्यमातून व लोकसहभागातून निर्मिती केली आहे.शेकड़ो कविसम्मेलने, कोमसाप राज्यस्तरीय युवा साहित्य सम्मेलन कोमसाप जिल्हास्तरीय साहित्य सम्मेलन तसेच राज्यस्तरीय परिसंवाद साहित्य ,सांस्कृतिक कला क्रीड़ा चित्रपट विविध विशेष उपक्रम राबविणारे मुख्यमंत्री यानीं यांचा विधान सभेत विशेष गौरव केला आहे. राजकीय साहित्यिक कविता या संमेलनात सादर करुन समारोप सम्मेलन संचालन केले. अमेय रानडे यानी ही सहभाग घेउन अंबरनाथ चे नाव प्रसिद्ध केले. तसेच महाराष्ट्र व मॉरीशसमधील २५ हून अधिक कवीनी यावेळी त्यांच्या कविता सादर केल्या. डॉ प्रदीप धवळ.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम