मोर्चा – शेतमजूर युनियनचे २४ – २५ जानेवारीला मोर्चा

लाल बावटा शेतमजूर युनियनची प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि २० जानेवारी २०२४

शेतमजूर युनियनचे २४ – २५ जानेवारीला मोर्चा

लाल बावटा शेतमजूर युनियनची प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती

चोपडा – शेतमजूर युनियन तर्फे येत्या २४ जानेवारी रोजी चोपडा तहसीलवर तर २५ जानेवारी रोजी रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लाल बावटा शेतमजूर युनियन प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिलेली आहे.

लाला बावटा शेतमजूर युनियनने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आदिवासी कष्टकरी लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही.

मोर्चा

देशाचे पंतप्रधान अदाणी अंबानी या उद्योगपतींकडेच जास्त लक्ष देतात त्यांचे हित पाहतात. महागाई बेरोजगारी अन्याय अत्याचार वाढत आहेत तसेच महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे.

गुजरात मध्ये बिल्कीस बानो महिलेवर झालेल्या अत्याचाऱ्याना जन्मठेप झाली पण आरोपींना गुजरात सरकारने मोकळे केले. काहींनी त्यांच्या सत्कार केला.

शेवटी सुप्रीम कोर्टाने त्यांना परत जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिले. मणिपूरमध्ये देखील २ आदिवासी महिला वर अत्याचार झाले. धिंड काढण्यात आली. त्याची साधी दखल सरकारने घेतलेली नाही.

अजून हल्ले सुरूच आहेत. देशात अशा अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. दुसरीकडे सरकार रामराज्याच्या वल्गना करत आहे

दुसरीकडे संजय गांधी शाखे अंतर्गत शेतमजुरांची प्रकरण नापास करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे बरेच गरजू लाभापासून वंचित राहत आहेत.

या योजनात मिळणारी मानधन अत्यंत तुटपुंजे आहे म्हणून लालबावटा शेतमजूर युनियन खालील मागण्यासाठी मोर्चा आयोजित केलेला आहे.
शेतमजुरांना तीन हजार रुपये मानधन मिळावे,

श्रावणबाळ योजनेअंतर्गत मतदान कार्ड, आधार कार्ड तफावत असल्यास मेडिकल ऑफिसर यांनी केलेले वयाचे प्रमाणपत्र वैध धरावे, रहिवासी पुरावा मतदान कार्ड किंवा आधार कार्ड पैकी १ वैध समजावा.

जंगल गायरान जमिनीवरील भूमी आदिवासी यांची अतिक्रमणे नियमाकुल करा खेडोपाडी बेघर शेतमजुराला जागा उपलब्ध करून द्या तरच त्यांचे नावे प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या हप्ता टाका, किमान एक हजार चौरस फूट जागा घरकुलासाठी मिळावी, बांधकामासाठी पाच लाख रुपये निधी मिळावा,
आदिवासींचे प्रलंबित वनदावे मंजूर करा, अंगणवाड्यांना खाऊ पुरवणारे बचत गट यांना पूर्वत ग्रामपंचायत ने शिफारस केले प्रमाणे अंगणवाडीतील बालकांना खाऊ पुरवण्याच्या मक्ता मिळावा, शहरी भागातही दारिद्र्य खालील लोकांना घरकुल बांधण्याच्या प्रस्ताव मंजूर करावा.

त्यासाठी शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या नावे घराची जागा करा, मायक्रो फायनान्स चे कर्ज माफ करा. केंद्र सरकारकडून शेतमजुरांना दिल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजना, श्रावण बाळ इत्यादी योजनात गेल्या दोन वर्षापासून मिळणारी दोनशे रुपये कमी मानधन फरकासह अदा करा.

तरी या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी मजुरांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लाल बावटा शेतमजुर युनियनचे पदाधिकारी कॉम्रेड लक्ष्मण शिंदे, अध्यक्ष निर्मला शिंदे, उपाध्यक्ष कॉ. वासुदेव कोळी, सचिव का अमृत महाजन, अंबालाल राजपूत,

सचिव जीजाबाई राणे, गुरुदास मोरे, सरफराज शहा, जे डी ठाकरे, कौतिक कोळी, विजय सोनवणे, हरीश पवार, रंजना महाजन, अरमान तडवी, संजीव पारधी,

भास्कर सपकाळे, गोकुळ कोळी,  छोटू पाटील, प्रल्हाद जंजाळ, वसंत पाटील, शाहरुख तडवी, रतन भिल विखरण आदींनी केले आहे.

हे ही वाचा👇

कोळी जमातीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना अति संवेदनशील निवेदन सादर

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम