
युवती महासभेचा समारोप मोठ्या उत्साहात
विद्यापीठात आयोजन
जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या युवती महासभेचा समारोप मोठ्या उत्साहात झाला.
दि. १७ ते २३ जानेवारी पर्यंत झालेल्या या युवती सभेत महिला सशक्तीकरण, सबलीकरण व आत्मनिर्भरता यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शारदा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. चेतना नन्नवरे व सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महासभेचे उद्घाटन झाले. दि. १८ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या उद्यान निरीक्षक अश्विनी पाटील यांनी कुक्कुट पालन, पशपालन यामधील करीअरच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. दि. २२ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात युवतींची आरोग्य तपासणी करण्यात आली. दि. २३ जानेवारी रोजी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांच्या उपस्थितीत या युवती महासभेचा समारोप झाला. प्रशाळेच्या संचालक प्रा. मधुलिका सोनवणे अध्यक्षस्थानी होत्या. या समारंभात प्रा. रमेश सरदार, डॉ. आर.आर. चव्हाण, प्रा. अश्विनी मुंदडा, डॉ. अनिल बारेकर व विभागातील विद्यार्थिनी उपस्थिती होत्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम