रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराच्या धडकेत तरुण ठार

शहरातील गेंदालाल मिल परिसरातील घटना

बातमी शेअर करा...

रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराच्या धडकेत तरुण ठार

शहरातील गेंदालाल मिल परिसरातील घटना

जळगाव | प्रतिनिधी

शतपावलीसाठी गेलेला तरुण रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना ७ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शहरातील गेंदालाल मिल परिसरात घडली.

या अपघातात ईश्वर बबन पाटील (वय ३४, रा. गेंदालाल मिल) यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला शतपावली करत असताना जैन मंदिराजवळ रस्ता ओलांडत असलेल्या पाटील यांना शिवाजीनगरकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच रामेश्वर पाटील आणि किरण पाटील यांनी तातडीने रिक्षाद्वारे ईश्वर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या अपघातप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार फकिरा रंधे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम