राजस्तरीय संचलन चाचणी निवड शिबिरात विद्यापीठाचा संघ रवाना

बातमी शेअर करा...

राजस्तरीय संचलन चाचणी निवड शिबिरात विद्यापीठाचा संघ रवाना

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथे दि. २६ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित राजस्तरीय संचलन चाचणी निवड शिबिरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा १५ जणांचा संघ सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे.

या संघामध्ये ०७ स्वयंसेवक, ०७ स्वयंसेविका आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांचा समावेश आहे. सहभागी संघात कोमल जावरे, उन्नती वाला, केतकी शिंपी, तेजस्विनी पवार, टीना पाटील, अंकिता माळी, स्मिता पाडवी, गजानन बोरसे, मोहित सोनवणे, गणेश सपकाळ, देवेंद्र सोनवणे, रुपेश अहिरे, वरूण पाटील, मनीष शेवाळे यांच्यासह संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. मनीष करंजे यांचा समावेश आहे. हे सर्वजण २५ सप्टेंबर रोजी रवाना झाले आहेत. यावेळी प्रा. माहेश्वरी यांनी स्वयंसेवकांना शुभेच्छा देताना म्हटले की, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबविले जात आहेत. राज्यस्तरीय शिबिरात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना निश्चितच नवीन शिकायला मिळेल. अशी शिबिरे ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. व्ही. एम. रोकडे, प्रा. दिनेश पाटील, प्रा. करंजे, प्रा. इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी होणाऱ्या राज्यस्तरीय निवड शिबिरातून निवड झालेल्या स्वयंसेवकांना पुढे राष्ट्रीय स्तरावर प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील स्वयंसेवकांमध्ये विशेष उत्साह व आनंदाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम