बातमीदार | दि २४ डिसेंबर २०२३
जळगांव येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, व लातूर जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ ते २४ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो ( १४/१७/१९ वर्ष मुले व मुली ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेचे उद्घाटन तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई चे महासचिव श्री मिलिंद पठारे, अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांच्या हस्ते झाले यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच श्री सुभाष पाटील उपस्थित होते.
सदर स्पर्धेत नाशिक विभागातून जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू रूतीक कोतकर याने १९ वर्षांखालील मुलांच्या ७८ किलो वरील वजन गटात सुवर्ण पदक पटकावले.
तर मुलींमध्ये शौर्य तायक्वांडो अकॅडमी तथा इंदिरा बाई ललवाणी विद्यालय पहुर ची गौरी कुमावत हिने सुवर्ण पदक पटकावले सदर दोन्ही खेळाडूंची बैतूल ( मध्य प्रदेश ) येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे त्यांना जयेश बाविस्कर तसेच हरिभाऊ राऊत यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
मुलांमध्ये ५५ किलो आतील वजन गटात लोकेश महाजन, ४५ किलो मध्ये दानिश तडवी यांनी रौप्य पदक तर सिद्धांत घेटे याने कांस्यपदक पटकावले. मुलींमध्ये निकीता पवार, सानिका पाटील, खुषी बारी, यांनी कांस्यपदक पटकावले.
यांच्या या यशाबद्दल जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन, उपाध्यक्ष श्री ललित पाटील, कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी,
सचिव अजित घारगे, सौरभ चौबे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, तसेच अरविंद देशपांडे, श्रीकृष्ण चौधरी, श्रीकृष्ण देवतवाल, जिवन महाजन, सुनील मोरे, शुभम शेटे यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम