राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत मुलांचा नाशिक विभाग तर मुलींचा पुणे विभाग विजयी

जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे हस्ते पारितोषिक वितरण

बातमी शेअर करा...

राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत मुलांचा नाशिक विभाग तर मुलींचा पुणे विभाग विजयी

जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे हस्ते पारितोषिक वितरण

जळगाव प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा दिनांक २१ ते २३ जानेवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडल्या.

या स्पर्धेत मुलांच्या नाशिक विभाग संघाने प्रथम, मुंबई विभाग द्वितीय तर छ्त्रपती संभाजीनगर विभागाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. तर मुलींच्या गटात पुणे विभाग प्रथम, मुंबई विभाग द्वितीय तर नाशिक विभागाने तृतीय स्थान पटकाविले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे, शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग. स.सोसायटीचे संचालक विजय पवार, ग. स.सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील, सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालविश्र्व विद्यालयाचे संचालक सौरभ चौधरी, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारर्थी किशोर चौधरी, मीनल थोरात, महाराष्ट्र सेपक टकारो असोसिएशनचे सहसचिव प्रा.इकबाल मिर्झा, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी केले. कार्यक्रमास राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी, क्रीडा अधिकारी सचिन निकम, विशाल बोडके, भारत देशमुख यांची उपस्थिती होती.

स्पर्धेत नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर, छ्त्रपती संभाजीनगर व अमरावती विभागाचे मुले मुली संघ सहभागी झाले होते संघाची निवास, भोजन व मैदान व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आली होती. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम