राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत काशिनाथ पलोड स्कूलचे यश

संजीवनी स्पोर्ट्स असोसिएशन आणि जिल्हा कराटे संघटनाचे आयोजन

बातमी शेअर करा...

राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत काशिनाथ पलोड स्कूलचे यश
संजीवनी स्पोर्ट्स असोसिएशन आणि जिल्हा कराटे संघटनाचे आयोजन
जळगाव I प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल जळगाव येथील कराटे प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत यश मिळवले. जळगावात संजीवनी स्पोर्ट्स असोसिएशन आणि जिल्हा कराटे संघटना, जळगाव आयोजित राज्य स्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आल्या यात काशिनाथ पलोड पब्लिक स्कुल चे कराटे प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थी सहभागी झाले होते यात विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे यश मिळवले.

१) सुवर्ण पदक :-
परिधी सोनार, मोहित पाटील, ध्रुव पाटील, यशस्वी पुरोहित, हर्षदा पाटील, लिंगेश पाटील, जागृत निकम, वेदांत पाटील, कृतिका महाजन, सुरज शर्मा, गुर्वेश जेउरकर, आरोही पाटील, पियुष कोथळकर, यश सपकाळ, विश्वजित निकम, रुचा जेउरकर, अण्विता सोनवणे, पुनीत पाटील, वेदांत तिवारी, वेदांत पाटील

२) रौप्य पदक:- आर्यन पाटील, विहान नारंग, गीतिका पाटील, शिवराज कोळी, कार्तिक वाघ, अर्चित चौधरी, प्रियांशु वना पाटील, यथार्थ सोनवणे, रोनक पाटील, प्रियांशु चेतन पाटील, स्वामी पवार, हितेश पाटील, स्वराज चौधरी, वेदांत चौधरी, ओम पाटील, अथर्व पाटील, हेरंभ कोल्हे, काव्येश सोनवणे, ज्ञानेश पाटील, इशांत वारके

३) कांस्य पदक:- पुरुषोत्तम बारी, रुद्र पाटील, निरंजन बुंधे, समृद्धी त्रिवाने, दुर्वेश कोल्हे, मयंक सूर्यवंशी, यशस्वी नेमाडे, अथर्व पाटील, ह्वीदन सोनवणे, कौशल्य तिवारी

या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार काशिनाथ पलोड पब्लिक स्कुल चे प्राचार्य प्रवीण सोनावणे सर, समंन्वयिका अनघा सागडे दीदी, सहसमंन्वयक प्रदीप पाटील सर या सर्व प्रमुखांनी पदक व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला. या वेळी प्राचार्य प्रवीण सोनावणे सर यांनी मेहनत व जिद्दीने नाव कमवा आणि शाळेचे नाव देशपातळीवर घेऊन जावे असे मनोगतातून व्यक्त केले. प्रसंगी कराटे प्रशिक्षक ज्ञानेश्वर पवार, क्रीडा प्रशिक्षिका शिल्पा मांडे, क्रीडा प्रशिक्षक ईश्वर जोशी व शिक्षक, शिक्षकतेर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक ज्ञानेश्वर पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम