रावेरच्या सोनालीला पॉवर लिफ्टिंग मध्ये राष्ट्रस्तरीय सुवर्णपदक

बातमी शेअर करा...

रावेर प्रतिनिधी

राष्ट्रस्तरीय सब जूनियर, जूनियर, सीनियर व मास्टर पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २० ते २५ सप्टेंबर २०२२ दरम्यान गुवाहाटी आसाम येथे संपन्न झाल्या. यामध्ये कुमारी सोनाली राजेंद्र चौधरी हिने 53 किलो वजनी गटात एकूण 205 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. सोनाली ही राष्ट्रीय खेळाडू कल्पेश महाजन यांच्या न्यू ग्लोरी ऑफ चॅम्पियन अकॅडमी मध्ये सराव करीत असते. तीच्या या यशाबद्दल संजय मिसर, प्रदिप मिसर, अविनाश मिसर, महेंद्र महाजन, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. किशोर महाजन, प्रदीप महाजन यांनी अभिनंदन केले. यासाठी प्रशिक्षक कल्पेश महाजन, लखन महाजन, जयंत पाटील, तुषार सपकाळे तसेच महिला प्रशिक्षक प्रियंका महाजन यांच्याकडून तीला प्रेरणा मिळाली.
ती रावेर येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथील विद्यार्थिनी असून माजी सैनिक राजेंद्र रामदास चौधरी यांची सुकन्या आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम