रावेरला अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद यांची उमेदवारी
काँग्रेस मध्ये खळबळ
रावेरला अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद यांची उमेदवारी
रावेर
येथील माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद यांनी बंडखोरी करत आज अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
येथील इमाम वाड्यातील त्यांच्या निवासस्थानापासून शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह दारा मोहम्मद तहसीलदार कार्यालयात पोहोचले. रस्त्याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव पाटील, माजी आमदार राजाराम महाजन यांचे सुपुत्र तांदलवाडीचे मधुकर महाजन, रवींद्र चौधरी, जगदीश घेटे, ज्ञानेश्वर महाजन, कलिंदर तडवी, इस्माईल पहिलवान, कलीम मेंबर,आसिफ मोहम्मद यांच्यासह शेकडो समर्थक उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम