रावेर नगरपालिका निवडणूक : आरक्षण सोडत ; १२ जागा महिलांसाठी राखीव

बातमी शेअर करा...

रावेर नगरपालिका निवडणूक : आरक्षण सोडत ; १२ जागा महिलांसाठी राखीव

रावेर प्रतिनिधी 

रावेर : रावेर नगरपालिकेच्या १२ प्रभागांच्या २४ जागांसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दुपारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात एकूण १२ जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत.

नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. यावेळी महिलांसाठी, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तसेच अनुसूचित जाती-जमाती महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. पालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, कर्मचारी प्रशांत कोकाटे, वैभव नेते यांनी सहकार्य केले.

आरक्षण सोडत काढताना माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, पद्माकर महाजन, आसिफ मोहम्मद, सादिक शेख, अॅड. योगेश गजरे, शिवसेनेचे नितीन महाजन, रवींद्र पवार, महेंद्र गजरे, बाळू शिरतुरे, अमोल पाटील, पंकज वाघ, राजेश शिंदे, भास्कर महाजन, गयाउद्दिन काझी, महेश लोखंडे, अशोक गायकवाड, आयुबखा पठाण, डी. डी. वाणी, राजेंद्र महाजन, पंकज चौधरी यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभागनिहाय आरक्षण यादी खालीलप्रमाणे :

प्रभाग क्रमांक
1 नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला राखीव
2 नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला राखीव
3 नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला राखीव
4 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव सर्वसाधारण
5 अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला राखीव
6 सर्वसाधारण महिला राखीव सर्वसाधारण
7 सर्वसाधारण महिला राखीव सर्वसाधारण
8 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव सर्वसाधारण
9 अनुसूचित जाती महिला राखीव सर्वसाधारण
10 सर्वसाधारण महिला राखीव सर्वसाधारण
11 अनुसूचित जमाती महिला राखीव सर्वसाधारण
12 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव सर्वसाधारण
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम