रावेर मध्ये हिंदुत्वाचा विजय ; धनशक्ती विरुद्ध क्रयशक्ती या सामन्यात भाजप चे अमोल जावळे विजयी

कॉंग्रेसचे धनंजय चौधरी यांचा पराभव

बातमी शेअर करा...

रावेर प्रतिनिधी

रावेर विधानसभा मतदार संघात हिंदुत्वाचा विजय झाला असून धनशक्ती विरुद्ध क्रयशक्ती या सामन्यात भाजप तसेच महायुतीचे अमोल जावळे विजयी झाले आहे.

रावेर विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला असून अनेक राजकीय तज्ज्ञांचेही गणीत फेल झाले आहे. भाजपाचे अमाेल जावळे ४३,५६२ मताधिक्याने विजयी झाले. त्यांना १,१३,६७६ मते मिळाली तर काॅंग्रेसचे धनंजय चाैधरी यांना ७०,११४ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
येथील तहसील कार्यालयात मतमाेजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाली. चाैदा टेबलवर कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या मत माेजणीत सुरूवातीच्या चार फेऱ्यांमध्ये काॅंग्रेसचे धनंजय चाैधरी हे पुढे हाेते. चाैथीफेरी संपली ताे पर्यंत ४८४२ मतांनी धनंजय चौधरी हे अमाेल जावळेंच्या पुढे हाेते. पाचव्या फेरीत मात्र धनंजय चाैधरी यांना २३५८ मते मिळाली तर अमाेल जावळे यांना ७४६१ मते मिळाल्याने जावळे हे २६१ मतांनी चाैधरींच्या पुढे गेले त्यानंतर मात्र भाजपाचे अमाेल जावळे हे पुढे राहिले. सातव्या फेरीत जावळे हे ५३६६ मतांनी आघाडीवर हाेते. त्यांनंतर २४ व्या म्हणजे अंतिम फेरी पर्य्ंत जावळे हे आघाडीवरच राहिले. पाेस्टल मतदानात अमोल जावळे यांना ७९५ तर धनंजय चाैधरी यांना ८७६ मते मिळाली. संपूर्ण मतमाेजणी झाल्यावर भाजपाचे अमाेल जावळे यांना १ लाख १३ हजार ६७६ तर काॅंग्रेसचे धनंजय चाैधरी यांना ७० हजार ११४ मते मिळाली. प्रहार जनशक्तीचे अनिल चाैधरी यांना एकूण २५ हजार १७०, वंचीत बहुजन आघाडीच्या शमीभा पाटील यांना ८४५३, अपक्ष उमेदवार दारा माेहम्मद जफर माेहम्मद यांना ९८१४ मते मिळाल्याने भाजपाचे अमाेल जावळे यांचा ४३५६२ मतांनी दणदणीत विजय झाला. १२ व्या फेरीपासून भाजपाच्या कार्याकर्त्यांमध्ये जाेश संचारला हाेता. निकाल लागताच भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आतिषबाजी केली व जे.सी.बी.ने गुलाल उधळत पुष्पवृष्टी केली.

संपूर्ण मतमाेजणी झाल्यावर जावळे यांचे शहरात आगमन झाले. तहसील कार्यालयात आल्यावर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांच्याहस्ते विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम