
रावेर येथील भिका साळुंके यांना डाक्टरेट पदवी
रावेर प्रतिनिधी
येथील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन १०२९ चे पदाधिकारी तसेच महावितरण कंपनीत प्रधान तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेले भिका चैत्राम साळुंके यांच्या कार्यामुळे वर्ल्ड कल्चर एण्ड प्रोटेक्शन नवी दिल्ली या संस्थे कडून त्यांना डॉक्टरेट इन हेल्थ वेलनेस कोच ही पदवी घोषित करण्यात आली आहे
त्यांच्या विशेष कामगिरीत वजन वाढीमुळे होणारे त्रास धाप लागणे, गुडघे, टाच, कंबर दुखी, मधुमेह , रक्तदाब . हृदयविकार, थायराइड, स्त्रियांचे मासिक पाळी यासारखे आजार पित्त, गॅस, अपचन, लठ्ठपणा, विद्रुप शरीराची रचना, या सारखे विकार वजन कमी केल्यामुळे बरेच आजार कमी होतात भरपुर खाऊन वजन कमी केले जाते ते पण ऑनलाइन सकाळी क्लास घेवून उचित आहारा विषयी मार्गदर्शन ते करीत असतात. या कार्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात येणार आहे*
सदर पदवीदान सोहळा लवकरच दिल्ली येथे होणार आहे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन पदाधिकारी व सहकारी यांचेकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम