राष्ट्रवादी काँग्रेस OBC विभागाच्या महानगराध्यक्षपदी कौसर काकर

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि ९ जानेवारी २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस OBC विभागाच्या महानगराध्यक्षपदी कौसर काकर

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ओबीसी विभागाची राज्यव्यापी बैठक मुंबई येथे नुकतीच झाली. या बैठकीत अजितदादा व सुनिल तटकरे यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले.

यावेळी राज्यातील काही जिल्ह्यातील ओबीसी विभागाच्या नियुयांची घोषणा करण्यात आली.

त्यात जळगाव जिल्हा ओबीसी सेलच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी धरणगाव चे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांची तर महानगर जिल्हाध्यक्षपदी कौसर काकर यांची नियुक्ती करण्यात आली.

ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी सदर नियुक्ती केली असून ज्ञानेश्वर महाजन व कौसर काकर यांना अजितदादा पवार यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय पवार व महानगराध्यक्ष अभिषेक पाटील हे उपस्थित होते. या निवडीबद्दल ज्ञानेश्वर महाजन व कौसर काकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम