राष्ट्रीय विज्ञान दिवस – चोपडा महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आजच्या तरुणाईने प्रयत्न केला पाहिजे - ऍड संदीप भैय्या पाटील

बातमी शेअर करा...

बातमीदार | शनिवार दि. 9 मार्च 2024

राष्ट्रीय विज्ञान दिवस – चोपडा महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आजच्या तरुणाईने प्रयत्न केला पाहिजे – ऍड संदीप भैय्या पाटील

चोपडा – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्त वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय विज्ञान दिवस

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील

https://www.facebook.com/share/p/5dqiuax6cPKVhLZf/?mibextid=oFDknk

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य प्रा.कोल्हे सर व समन्वयक डॉ.शैलेश वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या प्रतिमेला मांल्यार्पण करून तसेच पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी वैज्ञानिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वीस मॉडल प्रेझेंटेशन आणि नऊ पोस्टर सादरीकरण करून उपस्थित परीक्षकांचे मन जिंकले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांच्या उल्लेखनीय सादरीकरणाला दाद दिली. याप्रसंगी उदयोन्मुख शास्त्रज्ञांनी दाखवलेल्या समर्पण आणि सर्जनशीलतेवर त्यांनी प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. बी. एम. सपकाळ आणि डॉ. कमलेश पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.डॉ. कुणाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने F.Y.B.Sc व S.Y.B.Sc च्या विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर्स बनवून त्याचे सादरीकरण केले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून भरगोच्च प्रतिसाद मिळाला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आजच्या तरुणाईने प्रयत्न केला पाहिजे’.

शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचे कार्य उंच शिखरे गाठण्यासाठी प्रेरणा देते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. पारितोषिक वितरण समारंभात प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पोस्टर व मॉडेल स्पर्धेतील विजेत्यांना सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. कुणाल गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. एल. बी. पटले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इलेक्ट्रॉनिक्स विभागातील

प्रा. पुनम गायकवाड व निशा पाटील, शिकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.

हे ही वाचा👇

समारंभ – चोपडा महाविद्यालयात ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ उत्साहात

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम