
रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे पाच ठिकाणी ६०० रोपांची लागवड
रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे पाच ठिकाणी ६०० रोपांची लागवड
जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे हिराबाग फार्म, मोहाडी येथील तीन मंदिरे, स्वामीनारायण मंदिर, रोटरी भवन व गार्डन आणि जलाराम मंदिर या पाच ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहाशे रोपांची लागवड करण्यात आली.
ग्लोबल वार्मिंगचे संकट, पर्यावरणाचे रक्षण आणि जळगाव आतील वाढते तापमान लक्षात घेता या उपक्रमात २४ तास शुद्ध हवा व ऑक्सिजन देणारे, औषधी वनस्पती, फळे व फुले यांची रोपे, शेड प्लांट, रेन ट्री यांचा या उपक्रमात समावेश केला आहे. शेतकरी बांधवांनाही रोपांची वितरण करण्यात आले.
अध्यक्ष गौरव सफळे, प्रशासकीय सचिव महेश सोनी, प्रकल्प सचिव देवेश कोठारी, प्रोजेक्ट मेंटॉर नितीन रेदासनी यांच्या मार्गदर्शनात ट्री प्लांटेशन कमिटी चेअरमन अंकित जैन, को – चेअरमन
कुश काबरा, प्रकल्प प्रमुख उदय कर्नावट, परिमल मेहता यांच्या नेतृत्वात सर्व सदस्यांनी वृक्षारोपणाचे नियोजन केले.
स्वामीनारायण मंदिर येथील कार्यक्रमात हेल्पिंग हॅन्ड ग्रुप व अमित चांदीवाल यांनी ३० ट्री गार्ड देऊन योगदान दिले.
यावेळी योगेश भोळे, सुनील सुखवानी, योगेश राका,अतुल कोगटा,
प्रा.डॉ.चेतन महाजन, सचिन वर्मा, अंकुर अग्रवाल, अनय दमानी, विपुल पारेख, उमेश सेठीया यांच्यासह रोटरी वेस्टच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम