
रोटरी जळगाव वेस्टतर्फे नवरात्रीत विद्यार्थिनींसाठी प्रबोधनाचा जागर
रोटरी जळगाव वेस्टतर्फे नवरात्रीत विद्यार्थिनींसाठी प्रबोधनाचा जागर
जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे नवरात्री जागर म्हणून शहरातील विविध शाळांमधील किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी प्रबोधनाचे अभियान सुरू असून त्यात ८०० हून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत असे प्रकल्प प्रमुख सरिता खाचणे यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांपासून शक्ती से सन्मान की और या घोषवाक्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे
त्यात मुलींच्या समस्या आणि स्वच्छता, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श जागरूकता, किशोरवयीन काळातील आरोग्य व काळजी व व्यक्तिमत्व विकासासह विविध विषयांवर प्रबोधन करण्यात येत आहे. रोटरी वेस्टच्या सदस्या असलेल्या डॉ. सोनल इंगळे, डॉ. प्रीती भारुडे, डॉ. ऋचा नवाल, डॉ. अर्चना काबरा, सरिता खाचणे, शिल्पा सफळे यांचा मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
रोटरी कॅलेंडर प्रमाणे सप्टेंबर महिना हा बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी मंथ म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार स्वच्छता आणि साक्षरता तसेच मासिक पाळी स्वच्छता आणि शिक्षण या विषयांवर हे विशेष जागरूकता अभियान आयोजित केल्याचे सहप्रकल्प प्रमुख शिल्पा सफळे व गरिमा राका यांनी सांगितले.
अभिनव माध्यमिक विद्यालय, जळगाव पब्लिक स्कूल, सरस्वती माध्यमिक विद्यालय, बाहेती विद्यालय येथे मुख्याध्यापक सरोज तिवारी, एन.के.पवार, दिपाली पाटील, पी.आर. जाधव यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात का.ऊ.कोल्हे विद्यालय, शारदा माध्यमिक विद्यालय, बहिणाबाई विद्यालय आणि तरसोद येथील शाळेत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
यशस्वीतेसाठी रोटरी वेस्टचे अध्यक्ष गौरव सफळे, प्रशासकीय सचिव महेश सोनी, प्रकल्प सचिव देवेश कोठारी यांच्यासह रोटरी वेस्टचे सर्व सदस्य व त्यांच्या कुटुंबातील महिला आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम