रोटरी जळगाव सेंट्रलने केली… रस्ता सुरक्षा, वाहतूक जागरूकता

दहा नियमांविषयी विस्तृत माहिती

बातमी शेअर करा...

रोटरी जळगाव सेंट्रलने केली… रस्ता सुरक्षा, वाहतूक जागरूकता
दहा नियमांविषयी विस्तृत माहिती
जळगाव प्रतिनिधी

येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे रस्ता सुरक्षा आणि वाहतूक जागरूकता या विषयावर व्याख्यानाच्या आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष दिनेश थोरात, मिलन मेहता, राजू कोचर यांची प्रमुख उपस्थिती तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुहास गाजरे यांची उपस्थिती होती.
यावेळी व्याख्यानात बोलताना राहुल गायकवाड यांनी वाहन चालवताना घ्यावयाची काळजी व त्याचे दहा नियमांविषयी त्यांनी विस्तृत माहिती दिली.वाहन चालवताना माहिती, ज्ञान आणि शहाणपण या त्रिसूत्रींचा वापर करावा असे ही त्यांनी सांगितले.
जळगावात २०२४ मध्ये ५१७ महाराष्ट्रात १५ हजार तर देशात १ लाख ७४ हजार लोकांचा अपघाती मृत्यू झाले. आणि देशाच्या सीमेवर २२५ जवान शहीद झाले, या अर्थाने शहरातच वाहन चालवताना अधिक खबरदारी घ्यावी अशी गंभीर सुचना त्यांनी
केली. आपल्या मोबाईलला जसे कव्हर लावतो, तसे वाहन चालवताना प्रत्येक वेळी हेल्मेट घालणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक दिनेश थोरात यांनी तर समन्वयक प्रा.तुकाराम गवळी यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन कंदर्प पाटील यांनी केले. प्रा.एस.डी.अहिरराव, प्रा.पी.जे.गायधने यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य
लाभले. व्याख्यानास ४७० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम