रोटरी मिडटाऊनतर्फे विद्यार्थ्यांना १८ सायकलींचे मोफत वितरण

हेमंत पाटील व किशोर सूर्यवंशी यांचे उदार आर्थिक सहकार्य

बातमी शेअर करा...

रोटरी मिडटाऊनतर्फे विद्यार्थ्यांना १८ सायकलींचे मोफत वितरण

हेमंत पाटील व किशोर सूर्यवंशी यांचे उदार आर्थिक सहकार्य

जळगाव (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांना शिक्षणात सुविधा मिळावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनतर्फे १८ सायकलींचे मोफत वितरण करण्यात आले. हा उपक्रम रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या सहकार्याने आणि हेमंत पाटील (१६ सायकली) व किशोर सूर्यवंशी (२ सायकली) यांच्या आर्थिक योगदानातून साकार झाला.

या कार्यक्रमात अध्यक्ष छाया पाटील, ॲड. किशोर पाटील, डॉ. के. सी. पाटील, शंकरलाल पटेल, डी. ओ. चौधरी व श्रीरंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन सतत सामाजिक उपक्रमांत अग्रेसर राहिले असून, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता क्षेत्रातही विविध उपक्रम राबवत आहेत. विद्यार्थ्यांना सायकली देऊन त्यांचा शालेय प्रवास सुलभ व्हावा यासाठी क्लबचा हा स्तुत्य उपक्रम अनेकांच्या कौतुकास पात्र ठरतो आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम