
रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे व्होकेशनल अवॉर्डचे वितरण
दोन नवीन सदस्यांचे स्वागत
जळगाव प्रतिनिधि
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे पाच व्यक्तींना व्होकेशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आले, तर दोन नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे माजी प्रांतपाल व व्होकेशनल कमिटीचे डिस्ट्रिक्ट चेअरमन राजेंद्र भामरे (मालेगाव) यांची प्रमुख अतिथी म्हणून आणि व्यासपीठावर अध्यक्ष दिनेश थोरात, मानद सचिव समर्थसिंग पाटील, माजी अध्यक्ष एस.के.वाणी यांची उपस्थिती होती.
व्होकेशनल मंथ निमित्य शहरातील मंडप, स्टेज उभारणी व सजावट करणारे विकास सुरवाडे, लाईट आणि साऊंडची सुविधा देणारे हेमंत जोशी, फुले हार बुके तयार करणारे श्रीराम बारी, मेडिकल ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या गायत्री गुळवे आणि सायकल दुरुस्तीसह दुचाकी, चारचाकीचे पंक्चर व दुरुस्ती करणारे राजेंद्र तिरमले यांचा कुटुंबियांसह माजी प्रांतपाल भामरे यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शून्यातून निर्मिती करीत कठोर परिश्रमाने कर्तुत्वाची उंची गाठणाऱ्या व्यावसायिकांचा रोटरी जळगाव सेंट्रलने व्होकेशनल अवॉर्ड प्रदान करून गौरव केला आहे. हा सन्मान त्यांच्या संघर्षमय वाटचालीचे फलित आहे असे राजेंद्र भामरे यांनी मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले.
सत्कारार्थींच्या वतीने हेमंत जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार प्राप्त व्यावसायिकांची माहिती माजी अध्यक्ष राजेश चौधरी यांनी करून दिली.
रत्नाकर पाटील व गौरव मेहता या दोघांना माजी प्रांतपाल भामरे यांच्या हस्ते रोटरी पिन सदस्यत्व देण्यात आले. नवीन सदस्यांची माहिती मेंबरशिप कमिटी चेअरमन व माजी अध्यक्ष डॉ. अपर्णा भट यांनी दिली
.
माजी अध्यक्ष महेंद्र रायसोनी यांच्या हस्ते माजी प्रांतपाल भामरे यांचा सत्कार करण्यात आला. परिचय प्रेसिडेंट इलेक्ट जितेंद्र बरडे यांनी तर प्रास्ताविक शामकांत वाणी यांनी केले. आभार साधना दामले यांनी मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम