
लहान मुलांच्या क्रिकेट वादातून वृद्ध महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण ; चौघांविरोधात गुन्हा दाखल
लहान मुलांच्या क्रिकेट वादातून वृद्ध महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण ; चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव, (प्रतिनिधी) – लहान मुलांच्या क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या वादात होऊन एका वृद्ध महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना दि. २ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कालिंका माता मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नावखुर्द येथील, सध्या कालिंका माता चौकात वास्तव्यास असलेल्या ताराबाई सुकलाल शिंदे (वय ६०) या ताटपत्री शिवण्याचे काम करतात. दि. २ रोजी रात्री लहान मुलांच्या क्रिकेट खेळताना किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांत वाद झाला. या वादाचे पर्यवसान हातघाईत होऊन संशयित विजू शिंदे याने हातातील लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
त्यानंतर त्याचा मुलगा एकनाथ व सून सुनिता यांनीही शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच अमोल साळुंखे आणि देविदास सोळंखे यांनीही जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ताराबाई शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांमध्ये सुनिता आवल्या शिंदे, विजू पिंटू शिंदे, अमोल सुकलाल साळुंखे आणि देविदास लाला सोळंखे (सर्व रा. मोदीपूर, ता. जळगाव जामोद, ह. मु. कालिंका माता मंदिर परिसर) यांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश वंजारी करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम