लाडकी बहीण योजनेची तालुकास्तरीय बैठक संपन्न
तालुका अध्यक्ष नामदेव पाटील यांच्यासह तहसीलदारांची होती उपस्थिती
लाडकी बहीण योजनेची तालुकास्तरीय बैठक संपन्न
तालुका अध्यक्ष नामदेव पाटील यांच्यासह तहसीलदारांची होती उपस्थिती
चोपडा l
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तालुकास्तरीय समितीची पहिली सभा तालुका अध्यक्ष नामदेव बाबुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय चोपडा येथे दुपारी एक वाजता संपन्न झाली.
या सभेला समिती सदस्य विकास काशिनाथ पाटील, गोरख भिवा कोळी, तसेच संरक्षण अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, बचत गटाचे तालुका समन्वयक, नायब तहसीलदार आर.आर. महाजन व सदस्य सचिव तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात हे उपस्थित होते.
तालुक्यातून सदर योजनेसाठी विक्रमी 38416 अर्ज आले व त्यापैकी 35973 अर्ज योजनेसाठी पात्र झाले आहेत, उर्वरित अर्ज त्रुटी अभावी अर्जदार यांना त्रुटी पूर्तता करून घेण्यासाठी परत पाठवले असून, पूर्तता केल्यावर सदर अर्ज देखील मंजूर करण्याची कारवाई तात्काळ करण्यात येईल अशी माहिती सभेवेळी सदस्य सचिव यांनी दिली.
तसेच दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमा बाबत केलेल्या नियोजनाची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
त्याचप्रमाणे सदर योजनेचे पोर्टल सुरू असून पात्र लाभार्थी अद्यापही अर्ज करू शकतात, अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या सदस्य आशा सेविका व शासकीय कर्मचारी यांनी गावागावात संपर्क करून उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान देखील सभेवेळी अध्यक्ष नामदेव पाटील यांनी केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम