लासूर येथे कोट्यवधींच्या विकास कामांचा श्रीगणेशा

आ. सौ. लताताई व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते झाले भूमीपूजन

बातमी शेअर करा...

लासूर येथे कोट्यवधींच्या विकास कामांचा श्रीगणेशा

आ. सौ. लताताई व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते झाले भूमीपूजन

चोपडा l प्रतिनिधी

चोपडा तालुक्याच्या आ. सौ. लताताई सोनवणे व माजी आ. यांच्या नेतृत्वात तालुक्यात विकासकामांची गंगा वाहत आहे. मागील 5 वर्षात

हजारो विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण संपन्न झाले असून त्यात रस्ते, पेव्हर ब्लॉक, सामाजिक सभागृह यांच्या समावेश आहे.

तालुक्यातील मराठे ग्रामस्थांकरिता मूलभूत प्रश्न असलेल्या लासूर-मराठे-गणपुर रस्त्याचे डांबरीकरण तसेच लासूर गावातील मारुती मंदिर पासून 200 मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण

आदी विकासकामांचे भूमिपूजन आ.लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते तर माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

लासूर
लासूर

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून विरोधकांकडे आम्ही लक्ष देत नाही असे प्रतिपादन माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, महिला आघाडी तालुकाप्रमुख मंगलाताई पाटील, माजी उपसरपंच ए.के.गंभीर सर, कैलास बाविस्कर,

https://www.facebook.com/share/p/p1bsVrwHtDc4Sk3s/?mibextid=oFDknk

मालखेडा सरपंच गणेश पाटील, गलंगी सरपंच शितल देवराज यांसह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा 👇

विकासाचा महामेरू, अवघा तालुका विस्तारू – माजी आ. प्रा. चंद्रकांतजी सोनवणे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम