लोकार्पण – विकसित भारत रथाचे आ सुरेश भोळे यांच्या हस्ते लोकार्पण

लोकसभा मिशन 2024 ला प्रारंभ

बातमी शेअर करा...

बातमीदार | रविवार दि 10 मार्च 2024

लोकार्पण – विकसित भारत रथाचे आ सुरेश भोळे यांच्या हस्ते लोकार्पण

लोकसभा मिशन 2024 ला प्रारंभ

जळगांव – येथील जळगांव शहर विधानसभेचे सदस्य आ. सुरेश भोळे उर्फ राजुमामा यांच्या हस्ते लोकसभा मिशन 2024 ला प्रारंभ करण्यात आला असून विकसित भारत रथाचे आ सुरेश भोळे (राजुमामा) यांनी लोकार्पण केले.

लोकार्पण

भारतीय जनता पार्टी जळगाव शहर, ग्रामीण व अमळनेर विधानसभेची संयुक्त बैठक आज नव्यानेच तयार झालेल्या भा ज पा कार्यालय जि एम फाउंडेशन येथील अत्याधुनिक असलेल्या भा ज पा नवीन कार्यालयात पहिलीच बैठक दिनांक 9 मार्च रोजी दुपारी 1 वाजता संपन्न झाली.

https://www.facebook.com/share/p/F2pHo9Vp7idKChXr/?mibextid=qi2Omg

या बैठकीमध्ये जळगाव लोकसभा निवडणूक संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. लोकसभा मिशन 2024 सुरवात करण्यात आली. बैठकिला आ सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज,

सौ उज्वलाताई बेंडाळे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील यानी सूत्रसंचालन केले. या बैठकीस विधानसभा निवडणुक प्रमुख विशाल त्रिपाठी, ग्रामीण चे चंद्रशेखर अत्तरदे तसेच अपेक्षित पदाधिकारी व कार्यकर्त्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नंतर विकसित भारत रथाचे लोकार्पण आ सुरेश भोळे राजु मामा याच्या हस्ते करण्यात आले. याचे प्रमुख विठ्ठल पाटील असून सहा विधानसभेत हा रथाचे प्रचार प्रसार करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती  या रथाच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा 👇

पशुपतीनाथ – महाशिवरात्री निमित्त पशुपतीनाथचे रुद्राक्ष वाटप

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम