
वडधे वाळू ठेक्यावरून नियमबाह्य वाळू उपसा, उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
पत्रकार राकेश पाटील यांचे निवेदन
भडगाव : प्रतिनिधी
भडगाव शहराजवळ वडधे येथिल गिरणा नदी पात्रातील वाळू ठेक्याचा लिलाव झालेला आहे . या ठेक्यातील वाळू उपसा करताना शासनाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत . नियमांचे उल्लंघन करून चालू असलेल्या या ठेक्या संदर्भात जळगाव उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना पत्रकार राकेश पाटील यांनी निवेदन दिलेले आहे . ठेकेदार अगदी बिनधास्तपणे सुर्यास्तानंतर आणि सुर्योदयापूर्वी वाळू उत्खनन आणि वाहतूक करत आहे . खुलेआमपणे रात्रभर ठेकेदार अगदी मनमानी पध्दतीने आपला उद्योग करतो आहे . ठेका ४ महिन्यापूर्वीच सुरु झालेला आहे .३५७८ ब्रास वाळू उलण्याची परवानगी ठेकेदारास लिलावाद्वारे मिळालेली आहे . आतापर्यंत ठेका चालू होवून ४ महिने उलटले आहेत .जेवढी ब्रास वाळू उचल करण्याची परवानगी होती त्यापेक्षा कैक पट जास्त वाळूचा उपसा ठेकेदाराने केलेला आहे अशी चर्चा आहे .आणि शासन दरबारी मात्र कमी आकडेवारी दाखविली जात आहे असे बोलले जात आहे .
ठेकेदारास वाळू उचल करण्यासाठी ११२५० चौरस मिटर क्षेत्र उपसा कामी दिलेले असताना ठेकेदार त्याचे क्षेत्र सोडून इतरत्र बिनधास्तपणे वाळू उपसा करून मोकळा झालेला आहे . इतर क्षेत्रात वाळू उपसा संबधी काही दिवसापूर्वी या ठेक्यावरुन चांगलाच वाद निर्माण झालेला होता . वाक आणि वडधे हद्दीत परवाना नसताना ही कित्येक ब्रास वाळू उपसा अवैधपणे केलेला आहे .आजुबाजुच्या गावकऱ्यांच्या तशा स्वरूपाच्या तक्रारी देखील ठेक्यासंबधी आहेत . यावेळी तहशिलदार यांनी काही दिवस ठेका बंद केलेला होता .
०.९० मीटर खोलीपर्यंत नदीपात्रातून वाळू उपसा करावा असा आदेश असताना त्यापेक्षा जास्त खोली करून सर्रास वाळू उपसा चालू आहे .पूर्णपणे शासनाचे नियम धाब्यावर बसवून होणारा वाळू उपसा करणारा ठेकेदार मुकेश नंदकिशोर पाटील कुणालाही जुमानत नाही .वाळू उपसा केल्यानंतर वाळू वाहतूक करताना वाळूचे वाहन ताडपत्री किंवा प्लास्टिक पेपरने आच्छादित करून वाळू वाहतूक करणे बंधनकारक असताना ठेकेदार मात्र एकही वाहन अच्छादित करत नाही . ओपन पध्दतीने वाळू वाहतूक चालू आहे .आताच ३ जणांचा वाळू वाहतूक प्रकरणी मृत्यु झालेला आहे . वाळूचे रिकामे टूक्टर पलटी होवून ३ जणांना आपला जिव गमवावा लागला . यापूर्वी देखिल काही जणांना जीव गमवावा लागला .अजून किती जणांचा जीव हा वडधे वाळू ठेका घेणार आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होवू पाहत आहे . नियमबाह्य पध्दतीने चालू असलेला हा ठेका चक्क गौण खनिज उत्खनन नियमावली आणि महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६च्या तरतूदी या गोष्टींची चांगलीच पायमल्ली करताना दिसत आहे .
अशा प्रकारे होणारे वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक , नियम न पाळता केले जाणारे उत्खनन वरिष्ठ पातळीवरून तपासणे गरजेचे आहे . जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी ,जिल्हा खनिकर्म अधिकारी , खनिकर्म निरिक्षक यांनी ठेक्याच्या जागी येऊन पाहणी करणे गरजेचे आहे . तरि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तात्काळ या बाबतीत पाहणी करून नियमांबाह्य होणारा वाळू उपसा थांबवावा आणि महसूल मंत्री यांनी देखिल या बाबतीत लक्ष घालावे . अशी पर्यावरण प्रेमीची अपेक्षा आहे .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम