वह्या वाटप – ३० हजार गरिब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून

आदिवासी दिवस साजरा करताय भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा

बातमी शेअर करा...

वह्या वाटप – ३० हजार गरिब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून

आदिवासी दिवस साजरा करताय भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा

चोपडा l प्रतिनिधी

ग्राम विकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन व केंद्रीय क्रीडा, युवक कल्याण मंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे अनुसूचित जमाती जिल्हा अध्यक्ष मगन बाविस्कर (सर) यांच्या माध्यमातून

चोपडा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या गोर गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून ३० हजार मोफत वह्या वाटप करून जागतिक आदिवासी दिवस खऱ्या अर्थाने साजरा करण्यात आला आहे.

९ ऑगस्ट जागतिक क्रांतीदिवस व आदिवासी दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे हा स्तूत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत जि.प.शांळामधील व इतर गरिब विद्यार्थ्यांना वह्या वाटप सुरू झाले असून जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांना यांचा लाभ होणार आहे अशी माहिती मगन बाविस्कर सर यांनी दिली आहे.

हे समाजोपयोगी काम पार पाडण्यास चोपडा ग्रामीण चे सरचिटणीस विजय बाविस्कर, दिपक बाविस्कर, पंचायत राज सोशल मिडीया धर्मदास पाटील, माजी सभापती आत्मारामभाऊ म्हाळके,

माजी विस्तारक प्रदिप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, रविभाऊ मराठे, माजी पं. स. सदस्य भरत बाविस्कर, माजी नगरसेवक गजेंद्र जैसवाल, तुषार पाठक, जीवन पाटिल,

अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाईदास कोळी यांची टीम कामाला लागली आहे. लवकरच तालुका भरातील विद्यार्थ्यांच्या हातात वह्या पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम