वाडे चे सुपुत्र देवराज पाटील यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण

वाडे चे सुपुत्र देवराज पाटील यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या वाडे ता भडगाव येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी शशिकांत सहादू पाटील यांचा नातू व धुळे येथे नोकारी निमित्त स्थायिक झालेले कलाशिक्षक मनीष शशिकांत पाटील यांचा मुलगा देवराज मनीष पाटील हे यूपीएससी च्या परीक्षेत ४६२च्या रँकने उत्तीर्ण झाले भारतीय प्रशासकीय सेवेतील अतिकठीण व अत्यंत महत्वाच्या आणि वरिष्ठ अधिकारी ह्या पदावर मजल मारणारे ते बहुदा कजगाव परिसरातील पहिलेच असावे अत्यन्त कठीण मेहनतीच्या जोरावर देवराज पाटील यांनी हे यश संपादन केले आहे वाडे सारख्या अगदी छोट्याशा गावातील तरुणाने थेट यूपीएससी परिक्षेत यश मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यूपीएससी चा निकाल जाहीर होताच त्यांचे आजोबा शशिकांत पाटील काका बबलू पाटील परिवाराने व नातवाईकांनी वाडे ग्रामस्थांनी एकच जल्लोष करून आनंद साजरा केला यूपीएससी उत्तीर्ण झाल्याबद्दल देवराज पाटील यांच्यावर विविध स्थरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम