विकासाचा महामेरू, अवघा तालुका विस्तारू – माजी आ. प्रा. चंद्रकांतजी सोनवणे

आण्णासाहेबांनी पुर्ण मतदार संघात विकास कामांचा पहाडच नव्हे तर न भुतो न भविष्यते एवढया कामांचा डोंगर उभा केला आहे

बातमी शेअर करा...

विकासाचा महामेरू, अवघा तालुका विस्तारू – माजी आ. प्रा. चंद्रकांतजी सोनवणे

आण्णासाहेबांनी पुर्ण मतदार संघात विकास कामांचा पहाडच नव्हे तर न भुतो न भविष्यते एवढया कामांचा डोंगर उभा केला आहे

जपर्यंत  कधीच नाही,कोणीच नाही.. एवढा विकास अगदी चोपडा तालुक्यातील आदीवासी व सखल भागातील खेडापाडयात, तसेच नागरी भागातही विकास कामांचा सपाटा लावून तालुक्यात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे.

दोन पंचवार्षिक कशा शांततेत निघून गेलीत ते समजले सुध्दा नाही. विरोधकांची झोपच उडाली आहे. त्यांनी त्यांची आमदारकी स्वतःचा स्वार्थ साधत ऐषोआरामात काढली हे सर्व तालुकावासियांना कळून चुकले आहे.

अक्षरशः आण्णासो चंद्रकांत साोनवणेंनी करोडो रूपयांची विकास कामे करून त्यांना निलाजरे करून टाकले आहे. जनतेची दिशाभूल करून निवडून येणे व राजेमहाराजे सारखी सत्ता भोगणे हा मतदारांचा विश्वासघातच असतो.

अनेक आलेत आमदार झालेत, पण विकासकामे शुन्य. काहींनी शुन्यातून स्वतःला साधूमहंताची खोटी प्रतिमा तयार करून कित्येक पिढयांची कमाई करून घेतली. हे जगजाहीर आहे. तालुक्यात कोणीही सांगेल.

तालुक्यात गावे माहित नसलेले घरात बसून पैशांच्या जोरावर आमदारही होवून गेलेत. पाच वर्षात कोणाला दिसलेही नसतील. हे ही जनतेने सहन केले आहे.

काहींनी अनेक पंचवार्षिक भोगून तालुक्यावर पुर्ण दुर्लक्ष केलं. ताकत होती, शब्दाला किंमत होती, वजनही होतं पण तालुक्यासाठी, जनतेसाठी कोणताच प्रकल्प आणू शकले नाहीत.

विकासाचा
विकासाचा

तालुका अगदी आदिवासीच ठेवला. हे जुने जाणकार सांगतीलच.

जवळचे अमळनेर, शिरपूर या तालुक्याचे तेथील आमदारांनी चित्र बदलवून टाकलं पण चोपडा तालुका तसाच राहिला. एका वेळेला २-२, ३-३ आमदार असून सुध्दा काहीच झालं नाही.

या तालुक्याची जनता साधीभोळी आहे. गोड बोलण्याला आणि पैशाला भुलून जात होती.

पण ती सर्व परंपरा माजी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणेंनी मोडून काढली. अगदी शिस्तीत, आवाज न होवू देता ऊन, वारा व भर पाऊसात विकास कामांची उदघाटने करण्यावर भर दिला. आणि विरोधकांचे सर्व मुद्दे अक्षरशः खोडून काढलेत.

दुसरा विशेष मुद्दा असा कि, आपल्या सोबत असलेल्या पोलीस सुरक्षा रक्षकांना आपल्या परिवाराचा सदस्य समजून रक्षाबंधना दिवशी आ. सौ. लताताई सोनवणे व डॉ अमृता ताई सोनवणे यांनी राखी बांधून सत्कार करीत भेट म्हणून कपडे व इतर साहित्य देखील दिले. आज पावेतो जिल्ह्यातच काय तर असे सत्कार करणारे आमदार महाराष्ट्रात देखील दिसून आले नाहीत.

विकासाचा
विकासाचा

..खोटा प्रचार किती करावा..?
गुंड आहेत,दादागिरी करतील..दोन पंचवार्षिक होवून गेल्यात. कुठं दिसली गुंडगिरी..? दादागिरी..? विरोधकांच्या काळात तरी ठराविक लोकांची दादागिरी, जातीभेद, गुंडगिरी होती. हे  सर्व जनता ओळखून आहे.

आण्णासाहेबांनी लुच्चीलबाडी, दादागिरी, जातीभेद सर्व मुळासकट नष्ट करून टाकले. नुसत्या विकास कामांवर भर दिला. म्हणून .. आण्णासाहेबांचा आवाज आहे.

त्यांनी नैतिक वजन तालुक्यात निर्माण केले आहे. कोणासारखं गोडबोलून जनतेची फसवणूक केली नाही. पैशाने जनतेला भुलवलं नाही.

विकासाचा
विकासाचा

किंवा कोणासारखं विकास न करता फक्त पाच वर्ष जनतेला विसरून स्वतःचं कल्याण करून घेतलं नाही.

चांगल्याला चांगलं म्हणण्यालाही अंगी चांगुलपणा असावा लागतो. तीही नैतिकता विरोधक गमवून बसले आहेत. आण्णासाहेबांनी पुर्ण मतदार संघात विकास कामांचा पहाड उभा केला आहे. न भुतो न भविष्यते.

एवढया कामांचा डोंगर उभा केला आहे. त्यात सर्व विरोधक दबले गेले आहेत. गावागावात फिरायलाही त्यांना लाज वाटणारं आहे.

छोटेछोटे बंधारे ,धरणे पुनर्जिवीत करून तालुक्याचा पाण्याचा मोठा प्रश्न सोडवून टाकला आले. त्यामुळे बोअर, विहीरी जिवंत होवून शेतकऱ्यांना कायम स्वरूपी फायदा झाला आहे.

म्हणून चोपडा तालुक्यात माजी कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार सौ. लताताई या विकासजोडी शिवाय पर्याय नाही.

चांगल्याच्या पाठीशी जनतेने उभं राहवं हा धर्म संदेश आहे.

सत्यमेव जयते. हे ही धर्मलिखित ब्रीदवाक्य आहे.
सुज्ञ,जाणकारास सांगणे न लगे..
—— एक जाणकार व सुज्ञ मतदार..

हे हि वाचा 👇

विष्णापुर येथील आदिवासी आश्रमशाळेचे 14 कोटींच्या वास्तूचे लवकरच लोकार्पण !

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम