विक्री – क्रीडांगणाच्या आरक्षित जागेची बेकायदेशीर विक्री

माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बातमी शेअर करा...

क्रीडांगणाच्या आरक्षित जागेची बेकायदेशीर विक्री

माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जळगांव – शहरातील क्रीडांगण व ओपन स्पेस साठी मनपाने आरक्षित केलेल्या जागेवर बेकायदेशीर रित्या प्लॉट / तुकडे पडून विक्री चालू असून या मुळे मनपाचे नुकसान होत आहे.

या कडे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे.

विक्री

या बाबत सविस्तर माहिती अशी की, जळगांव शहरातील शेत सर्व्हे नंबर 347/5 मधील 5700 चौ. मी. जागा मनपा ने क्रीडांगण व ओपन स्पेस साठी आरक्षित केली आहे.

https://www.facebook.com/share/p/KScKWgy6e1uPmEC2/?mibextid=oFDknk

या आरक्षित जागेवर 42 ब ची परवानगी घेऊन जमीनीचे मालक यांनी बेकायदेशीर रित्या तुकडे पाडून प्लॉट ची विक्री चालू केली आहे. त्यामुळे मनपाचे नुकसान होत आहे.

अशी तक्रार माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, तहसीलदार, नगर रचना अधिकारी, शहर अभियंता बांधकाम विभाग मनपा यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.

सदर निवेदना सोबत कच्चा नकाशा देखील जोडला आहे. या प्रकरणी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

हे ही वाचा👇

चोपडा महाविद्यालयास कबचौ उमवि एकांकिका करंडक स्पर्धेत हॅट्रिक प्राप्त विजेत्यांचा झाला सत्कार

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम