विद्यापीठात गुरुपौर्णिमेनिमित्त मंत्र साधना कार्यक्रम उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा...

विद्यापीठात गुरुपौर्णिमेनिमित्त मंत्र साधना कार्यक्रम उत्साहात संपन्न
एकनाथ बावने यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि योगशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त मंत्र साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योगपंडित इंजि. एकनाथ बावने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या विशेष सत्रात सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे, योगशास्त्र विभागप्रमुख इंजि. राजेश पाटील, श्रीमती लता बावने यांची उपस्थिती होती. उपस्थितांना मार्गदर्शन करताना इंजि. बावने यांनी सांगितले की, “मंत्रांचे संस्कार नकारात्मकता दूर करतात. हठ योग, राजयोग, क्रियायोग व कुंडलिनी योगाद्वारे जीवनात उच्च ध्येय साध्य करता येते. सेवा, प्रेम व दान हे गुण मंत्र साधनेमुळे प्राप्त होतात.”

डॉ. नांद्रे यांनी गुरूंच्या मार्गदर्शनाचे जीवनातील महत्व अधोरेखित केले. प्रास्ताविक करताना इंजि. पाटील यांनी मंत्रसाधनेतील वर्णोच्चारातून निर्माण होणाऱ्या स्पंदनांची शक्ती स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लिना चौधरी यांनी केले तर प्रा. गितांजली भंगाळे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला प्रा. लिंता चौधरी, वाल्मिक पाटील, यशवंत गरूड, सुरेश बागुल, हिंमत जाधव यांच्यासह विद्यापीठाचे अनेक कर्मचारी उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या अध्यात्मिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम