
विद्यापीठाला पहिल्या क्रमांकाचा चषक प्राप्त
उत्कृष्ट कार्य भित्तीचित्र आणि उत्कृष्ट कार्यप्रगती अहवाल
विद्यापीठाला पहिल्या क्रमांकाचा चषक प्राप्त
उत्कृष्ट कार्य भित्तीचित्र आणि उत्कृष्ट कार्यप्रगती अहवाल
जळगाव प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला उत्कृष्ट कार्य भित्तीचित्र आणि उत्कृष्ट कार्यप्रगती अहवालात पहिल्या क्रमांकाचा चषक प्राप्त झाला.
दि. २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा झाली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा १९ विद्यार्थ्यांचा संघ स्पर्धेत सहभागी झाला होता. उत्कृष्ट कार्य भित्तीचित्र फिरता चषक प्रथम क्रमांक आणि उत्कृष्ट कार्यप्रगती अहवाल फिरता चषक प्रथम क्रमांकाचा मानकरी हा संघ ठरला. कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र.कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे, कक्ष अधिकारी शरद पाटील आदींनी संघाचे अभिनंदन केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम