विद्यार्थी आणि महाविद्यालयांना केलेले आर्थिक सहकार्य ही उद्याची भारतीय युवा पिढी घडविण्यासाठी बँकेने केलेली गुंतवणूक-अनिकेत पाटील

बातमी शेअर करा...

विद्यार्थी आणि महाविद्यालयांना केलेले आर्थिक सहकार्य ही उद्याची भारतीय युवा पिढी घडविण्यासाठी बँकेने केलेली गुंतवणूक-अनिकेत पाटील

मू.जे.महाविद्यालयात मेस्ट्रो स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

जळगाव प्रतिनिधी मूळजी जेठा (अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या वतीने दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय स्तरावरील मेस्ट्रो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या ऑनलाइन स्टॉक मार्केट स्पर्धेत ४३, बिझनेस आयडिया स्पर्धेत ३७, क्वीज स्पर्धेत १०१ व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेत ७२ अशा विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उदघाटन प्रसिद्ध उद्योजक मा.श्री.दत्तात्रय चौधरी (संचालक, मास-टेक कंट्रोल प्रा.लि) आणि केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालक मा.डॉ.मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या उपप्राचार्य डॉ. सुरेखा पालवे, अधिष्ठाता डॉ.ए.एन.आरसीवाला, मेस्ट्रो स्पर्धेचे आयोजक सचिव डॉ. विशाल देशमुख व सहसचिव डॉ. नितीन चौधरी उपस्थित होते. यावेळी उदघाटकीय मनोगतात दत्तात्रय चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी कल्पकता असेल तर त्याला चांगले जीवन जगता येते. आजच्या काळात कोणत्याही क्षेत्रात उद्योग किंवा व्यवसाय सुरु करून तो चालवणं आव्हानात्मक आहे, परंतु कठीणही नाही. उद्योग क्षेत्रात अनेक नवउद्योजकांना आपल्या कल्पनेतून व संकल्पनांमधून पुढे जाण्याची गरज आहे म्हणूनच अशा सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमधून आत्मविश्वास वाढवणा-या ठरतात असे म्हटले. अध्यक्षीय मनोगतात डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी शिक्षण हे आपले ध्येय व चांगला माणूस घडवण्यासाठी असते, म्हणूनच शाश्वत विकास ध्येयाला अनुसरूनच असतो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पर्धेविषयी भूमिकाकथन डॉ. सुरेखा पालवे यांनी केले. स्पर्धेचे प्रास्ताविक आयोजक सचिव डॉ. विशाल देशमुख यांनी केले. यावेळी मान्यवर व उपस्थितांचे डॉ.ए.एन.आरसीवाला यांनी आभार मानले.स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केसीई सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री. भालचंद्र पाटील,दि. जळगाव पीपल्स को.ऑ.बँक लि.चे अध्यक्ष अनिकेत पाटील, उपाध्यक्ष सी.ए डॉ.पी.एम.कोठारी, प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे उपस्थित होते. यावेळी या सर्व मान्यवरांच्या हस्ते चारही स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे ५०००रु., ३०००रु.,२०००रु. तसेच स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवविण्यात आले. तत्पूर्वी दिवसभर चाललेल्या मेस्ट्रो स्पर्धेचा आढावा आयोजक सचिव डॉ.विशाल देशमुख यांनी घेतला. दि. जळगाव पीपल्स को.ऑ.बँकेने या स्पर्धांच्या पारितोषिकांचे प्रायोजकत्व स्वीकारल्याबद्दल उपप्राचार्य डॉ. सुरेखा पालवे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रमुख अतिथी श्री. भालचंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतात, महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये असणारा तुमचा सहभाग हेच या स्पर्धेच्या यशस्वीतेचे गमक आहे असे प्रतिपादन केले. यावेळी श्री. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थी आणि महाविद्यालयांना केलेले आर्थिक सहकार्य ही उद्याची भारतीय युवा घडविण्यासाठी बँकेने केलेली गुंतवणूक आहे, त्यामुळे भविष्यातसुद्धा महाविद्यालयास बँक आर्थिक सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांमध्ये ओम राजपूत, राहुल जैन या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. त्यासोबतच संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. प्रवीण जैन व परीक्षकांच्या वतीने डॉ. अमेय लोहार यांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार आयोजक सहसचिव डॉ.नितीन चौधरी यांनी मानले. उदघाटन सत्राचे व समारोप सत्राचे सूत्रसंचालन पुर्वा बडगुजर व राहुल महाजन या विद्यार्थ्यांनी केले. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे मार्गदर्शक, समिती चेअरमन, समिती सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम