विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वस्तू च्या प्रतिकृती साकारल्या

विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये रंगतरंग स्नेहसंमेलन

बातमी शेअर करा...

विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वस्तू च्या प्रतिकृती साकारल्या

विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये रंगतरंग स्नेहसंमेलन

जळगाव I प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान गेल्या ३०वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काळाची गरज लक्षात घेऊन अनेक नवनवीन यशस्वी प्रयोग करत आहे.
यावर्षी सुद्धा विवेकानंद प्रतिष्ठान ने रंगतरंग या स्नेहसंमेलनाचे निमित्त साधून अहिल्यादेवी होळकर याचे त्रिशाताब्दी वर्ष साजरे करण्याचे ठरवले.

त्यानिमित्ताने अहिल्यादेवी होळकरांचा ज्वाजल्य इतिहास समाजासमोर यावा, विद्यार्थांना सुद्धा त्यांचा संपूर्ण इतिहास समजावा याच उदात्त हेतूने अहिल्यादेवी होळकर यांची चित्रारूपी माहितीपूर्ण प्रदर्शनी तयार केली पाहिजे अशी सुंदर कल्पना संस्थेच अध्यक्ष सन्माननीय श्री राजेंद्र नन्नावरे यांनी मांडली आणि सर्वांनी या कल्पनेस अनुमोदन दिले.

त्यासाठी एक समिती तयार करण्यात आली त्यात माहिती संकलन प्रमुख म्हणून सौ योगिता शिंपी दीदी व शिक्षक केतन वाघ
गजानन कोळी, प्राजक्ता यावलकर ,प्रवीण पाटील,आकाश शिगाने यांनी काम पहिले तर चित्र संकलन आणि डिझाईन प्रमुख श्री नितीन सोनवणे व तंत्र सहाय्य्क श्री अजय सोनवणे यांनी काम पहिले.

ही चित्रप्रदर्शनी अतिशय दुर्मिळ माहिती व चित्रांनी परिपूर्ण असून ती पाहण्यासाठी आपल्या सागर पार्क वर भरवण्यात आली असून त्याचा जास्तीत जास्त पालकांनी व जळगावर रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे करण्यात येते आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम