
विमा मंजूर – आ. सौ. लताताई सोनवणे व माजी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना ५१ कोटी २१ लाखाचा विमा मंजूर
पंतप्रधान खरीप पिक विम्याचा चोपडा तालुक्यात 31526 शेतकऱ्यांना लाभ
विमा मंजूर – आ. सौ. लताताई सोनवणे व माजी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना ५१ कोटी २१ लाखाचा विमा मंजूर
पंतप्रधान खरीप पिक विम्याचा चोपडा तालुक्यात 31526 शेतकऱ्यांना लाभ
चोपडा l प्रतिनिधी
तालुक्यातील सातही महसूल मंडळातील कापूस पिकासाठी एकूण ३१५२६ शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा काढलेला होता. सदर शेतकऱ्यांसाठी सन २०२३-२०२४ मध्ये आमदार सौ. लताताई सोनवणे व माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुरावा व प्रयत्नांमुळे दुष्काळ सदृश परिस्थिती तालुक्यांत जाहीर झाली होती.

त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून सतत पाठपुरावा आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी करुन त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे, गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ यांना सुचना केल्या होत्या.
यामुळे संपूर्ण तालुक्यातील सातही म़डळांमधील ३१५२६ शेतकऱ्यांना ५१ कोटी २१ लक्ष एवढा पिक विमा मंजुर झाला असून शासनाकडील हिस्सा कंपनीकडे जमा झाल्यानंतर काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे विम्याचे पैसे जमा होतील. याप्रसंगी आमदार सौ लताताई सोनवणे यांनी तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले.
हे ही वाचा 👇
केळीला फळाचा दर्जा मिळावा – खा.स्मिता वाघ यांची संसदेत मागणी

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम